करमाळ्यात महाविकास आघाडी विरोधात भाजपचे निषेध आंदोलन - Saptahik Sandesh

करमाळ्यात महाविकास आघाडी विरोधात भाजपचे निषेध आंदोलन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – काल (दि.२१) करमाळा शहरात महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतलेल्या कंत्राटी नोकर भरतीच्या निर्णयाच्या विरोधात जिल्हा भाजपच्या वतीने करमाळा शहरात तीव्र आंदोलन करून मविआचा प्रतिकात्मक पुतळा जाळून, जोडे मारो निषेध आंदोलन करण्यात आले.

कंत्राटी भरती संदर्भात सर्व GR तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने काढले असून राज्यातील विद्यमान महायुती सरकारला बदनामी करण्याचे कटकारस्थान महाविकास आघाडी केले असून त्या विरोधात आम्ही आंदोलन केले आहे असे भारतीय जनता पार्टीच्या वतीने सांगण्यात आले. भाजपचे युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष शंभुराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार तसेच जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले.

यावेळी आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “कंत्राटी भरती संदर्भात सर्व GR तत्कालीन मविआ सरकारने काढले होते. असे असताना काँग्रेस,राष्ट्रवादी (शरद पवार गट),शिवसेना (उबाठा गट ) हे व यांचे बाजारू नेते कंत्राटी नोकर भरती संदर्भात भाजपा विरोधात लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम करत आहेत.यामुळे तरुणांमध्ये रोष पसरवण्याच काम संबंधितानी केले आहे.यामुळे काँग्रेस,तत्कालीन राष्ट्रवादी व शिवसेना सरकारने कंत्राटी भरतीचे हे सर्व GR विद्यमान महायुती राज्य सरकारने रद्द केले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे. राज्यातील विद्यमान महायुती सरकारला बदनामी करण्याचे कटकारस्थान महाविकास आघाडीने केले आहे.

यावेळी आंदोलकांनी हातात फलके घेऊन शरद पवारांना निशाणा केला होता. त्यात अशी काही वाक्ये लिहिली होती.

“आपला नातू तुपाशी दुसऱ्याची पोर उपाशी”,
“नको खोटी भाषा गुंडाळा शरद पवारांचा गाशा”,
“विरोधकांचा डाव फसला विद्यार्थ्यांना दिला चकवा”,
“तरुणांचा कर्दन काळ शरद पवार शरद पवार”
“देवेंद्र भाऊ चे एकच वार शरद पवार गपगार”

या आंदोलनावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार, करमाळा तालुका सरचिटणीस सुहास घोलप, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, सोशल मीडिया प्रमुख नितीन कांबळे, प्रदेश युवा मोर्चा सचिव दीपक चव्हाण, रामभाऊ डहाने, कपिल मंडलिक, किरण बोकण, प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब कुंभार, महिला शहराध्यक्षा चंपावती कांबळे, जिल्हा सचिव शाम सिंधी, लक्ष्मण केकाण, नरेंद्र ठाकूर,

माजी शहराध्यक्ष चंद्रकांत राखुंडे, अमरजित साळुंके,सोशल मीडिया संयोजक नितीन झिंजाडे, जिल्हा चिटणीस विनोद महानवर,भैयाराज गोसावी,सुहास ओव्हळ, सचिन चव्हाण, रघुनाथ सावंत, ओंकार घोंगडे, विश्वजित जगदाळे, संदीप पवार, वनराज घोलप, बाळासाहेब तळेकर, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पै.अफसर जाधव, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!