क्षितिज ग्रुप तर्फे मानपत्र देवून भाजपचे गणेश चिवटे यांचा सन्मान - Saptahik Sandesh

क्षितिज ग्रुप तर्फे मानपत्र देवून भाजपचे गणेश चिवटे यांचा सन्मान

केम (संजय जाधव) : श्रीराम प्रतिष्ठाणच्यावतीने आयोजन करून यशस्वी केलेल्या सामुदायिकविवाह सोहळ्याच्या यशाबद्दल भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांचा क्षितिज ग्रुप तर्फे मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

सामुदायिक विवाह थाटामाटात आणि अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने घडवून आणणे, ही खूपच आव्हानात्मक गोष्ट होती, एक देखणा विवाह सोहळा संपन्न करून समाजापुढे श्रीराम प्रतिष्ठानने समाजापुढे आदर्श असे उदाहरण घालून दिले आहे. अशा भावना सर्व क्षितिजगृपच्या सदस्यांनी व्यक्त केल्या. यावेळी गणेश चिवटे व श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचे क्षितिज ग्रुपच्या सदस्यांनी अभिनंदन केले.

याप्रसंगी नलिनी जाधव, माधुरी साखरे, पुष्पा फंड,मंजू देवी,सुप्रिया येवले, उज्वला देवी, कावेरी देशमुख, स्वाती माने, माधुरी परदेशी यांनी भाग घेतला.श्रीराम प्रतिष्ठाच्या भावी कार्यास क्षितिज ग्रुपने शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे सदस्य विलास आबा जाधव, काकासाहेब सरडे, मोहन शिंदे, रामभाऊ ढाणे, अफसर जाधव, भीष्माचार्य चांदणे सर, गजराज चिवटे, संग्रामसिंह परदेशी, जगदीश भिंगारे, प्रमोद फंड, अमोल पवार, आजिनाथ सुरवसे, दिलीप पाटील, संजय किरवे, महादेव गोसावी आदिजन उपस्थित होते.

समाजातील भुकेले, निराधार वृद्ध, संघर्ष करत शिकणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थी यांच्या डब्याचा प्रश्न असे अनेक प्रश्न सोडवत सामाजिक बांधिलकी जपणारे एक वैशिष्ट्यपूर्ण असे राजकीय नेतृत्व म्हणजे गणेशजी चिवटे होय” – डॉ सुनीता दोशी (क्षितिज ग्रुप)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!