करमाळा तालुक्यातील रस्त्यांसंदर्भात भाजपाचे गणेश चिवटे यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदन.. -

करमाळा तालुक्यातील रस्त्यांसंदर्भात भाजपाचे गणेश चिवटे यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदन..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची अवस्था बिकट झाली असून,रस्त्यावरून जाताना नागरिक ,शालेय विद्यार्थी ,रूग्ण,व शेतीमालाच्या वाहतूकीसाठी सर्वांचे हाल होत असल्याने. ररस्ते विकास कामासाठी भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले.


या निवेदनामध्ये त्यांनी १)मौजे करंजे ते धायखिंडी इमीजा क्र.५ (अंदाजित रक्कम २.५०) २) मौजे देवळाली ते गुरसुळी इमीजा क्र ७ (अंदाजित रक्कम १५०) ३)मौजे शैलगाव ते सौदे इमीजा क्र ८( अंदाजित रक्कम १.२०) मौजे वीट ते झरे इमीजा क्र अ१२६ (अंदाजित रक्कम ५.२०) एकूण दहा कोटी ४० लाख रूपयांचे रस्त्यांच्या कामांची मागणी त्यांनी केली आहे. यावर प्रदेशाध्यक्ष यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उचित कार्यवाहीसाठी व मंजूरीसाठी प्रशासकीय यंत्रणेला योग्य ते आदेश दिले आहेत, तसेच गणेश चिवटे यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत कोणत्याही कामासाठी आपणास सर्व सहकार्य राहिल असे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी माढा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, सांगोला तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!