भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त करमाळ्यातुन भव्य मिरवणूक – रक्तदान शिबिरात 55 जणांचे रक्तदान..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा सकल जैन समाजाच्यावतीने जैन धर्माचे 24 वे तिर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक निमित्त करमाळा शहरातुन भव्य मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी सर्व जैन समाजातील नागरिकांकडून त्यांना अभिवादन करण्यात आले.

श्रावक पांढऱ्या शुभ्र तर श्राविकांनी केशरी वस्त्र परिधान केले होते.
याप्रसंगी सजविलेल्या पालखीत भगवान महावीरांची प्रतिमा ठेवून करमाळा शहरातील मेनरोडवरील दिगंबर जैन मंदिर येथून मुख्य रस्त्यावरून मिरवणुकीस सुरुवात झाली, पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भगवान महावीर की जय, जैन धर्म की जय,अहिंसा परमो धर्म की जय अशा घोषणा देण्यात आल्या. या जन्मकल्याणकाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. यामध्ये ५५ समाज बांधवांनी रक्तदान केले. या सर्व कार्यक्रमात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.