४० हजार रूपये किंमतीच्या बीएमडी मशीनची एसटीतून चोरी..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : हाडाची घनता मोजणाऱ्या ४० हजार रूपये किंमतीच्या बीएमडी मशीनची करमाळा एसटीमध्ये चोरी झाली आहे. हा प्रकार ११ नोव्हेंबरला सकाळी साडेसहा वाजता घडला आहे.
यात आरोग्य सुविधा पुरविणारे महेंद्र रा. कात्रज, पुणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की ११ नोव्हेंबरला करमाळा येथील डॉ. भोसले यांनी पेशंटच्या हाडाची घनता मोजण्यासाठी बीएमडी मशीन पाठवून देण्याबाबत सांगितले होत. त्यानूसार सदरची मशीन आमचा कर्मचारी विशाल अमर राठोड हा ११ नोव्हेंबरला सकाळी साडेचार वाजता मुंबई – करमाळा गाडीने करमाळा येथे आला. त्यावेळी सकाळी साडेसहा वाजता सदर बसमध्ये ४० हजार रूपये किंमतीची बीएमडी मशीन ही कोणतीतरी मुद्दामहून नेल्याचे लक्षात आले. चोरून ज्ञानेश्वर कापडी याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.