हिवरेचे सुपुत्र प्रा. डॉ. जयसिंग ओहोळ यांचे संविधानावर पुस्तक – २८ डिसेंबरला पुण्यात प्रकाशन

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता 22: हिवरे (ता. करमाळा) येथील रहिवासी, अभ्यासू प्राध्यापक व विचारवंत प्रा. डॉ. जयसिंग ओहोळ लिखित “भारतीय संविधान आणि लोकशाही अमृतमहोत्सवी वाटचाल : एक दृष्टिक्षेप” या महत्त्वपूर्ण पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा रविवार, दि. 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता पुणे शहरातील अब्दुल कलाम आझाद भवन, कोरेगाव पार्क येथे संपन्न होणार आहे.

भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित होत असलेले हे पुस्तक भारतीय संविधानाची जडणघडण, लोकशाहीची वाटचाल, घटनात्मक मूल्ये आणि नागरिकांची भूमिका यांचा सखोल, अभ्यासपूर्ण व समकालीन आढावा घेणारे आहे. त्यामुळे हे पुस्तक अभ्यासक, विद्यार्थी, वकील, प्रशासकीय अधिकारी तसेच जागरूक नागरिकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

या पुस्तकाचे प्रकाशन प्रख्यात विधीज्ञ ॲड. असीम सरोदे, राजकीय विश्लेषक केशव वाघमारे, नगररचना विभागाचे उपसंचालक उत्तरेश्वर लोंढे, संविधान अभ्यासक ॲड. संभाजी मोहिते, अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. नितीन तळपाडे तसेच पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्त वैशाली चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रकाश ओहोळ, रवींद्र भोसले, . ॲड.नवनीत अडसूळ, सुभाष (बापू) ओहोळ, वसंत पातारे, ॲड. अरुण जाधव, मिलिंद बोकेफोडे, डॉ. नितीन गाडे, संतोष कांबळे, प्रा. गणेश करे-पाटील, सदानंद सलगर, सागर काकडे, हृदयमानव अशोक आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

लोकशाही मूल्यांची जपणूक करण्याच्या दृष्टीने हा प्रकाशन समारंभ महत्त्वपूर्ण ठरणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन लेखक प्रा. डॉ. जयसिंग ओहोळ यांनी केले आहे.

