थकित कर्जदारांनी ३० जूनपर्यंत एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घ्यावा – प्रशासक दिलीप तिजोरे
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा अर्बन बँकेच्या थकीत कर्जदारांना बँकेचे प्रशासक दिलीप तिजोरे यांच्याकडून आव्हान करण्यात येते की बँकेने महाराष्ट्र शासनाची दिनांक 27 एप्रिल 2023 ची एक रकमी कर्ज परतफेड योजना स्वीकारली असून सदर योजना प्रत्येक थकबाकीदार कर्जदारांना माहीत होणे कामी प्रेस मीडिया, सोशल मीडिया व डिजिटल जाहिरात द्वारे प्रसिद्धी देण्यात आली होती.
सदर योजनेअंतर्गत आज अखेर 1 कोटी 70 लाखाची वसुली झालेली असून 70 थकीत कर्जदारांनी आपली कर्ज खाती बंद करून सदर योजनेस भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. ही योजना ३० जुनपर्यंत कार्यान्वित राहणार असून ३० जून नंतर उर्वरीत प्रत्येक थकीत कर्जदारांच्या तारण मालमत्तेचा जाहीर लिलाव केला जाणार आहे तसेच जे सभासद थकीत कर्जदारांना जामीनदार आहेत यांनाही सुचित करण्यात येते की, सदर थकीत कर्जास कर्जदारा एवढेच आपण ही जबाबदार आहात थकीत कर्जाच्या वसुलीपोटी आपल्यावरही जामीनदार या नात्याने कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे सबब आपणही आपल्या कर्जदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याकडील थकीत कर्जाची रक्कम बँकेत भरण्याच्या सूचना कराव्यात सूचना करूनही कर्जदार जर ऐकत नसेल तर कर्ज भरण्याचा तगादा लावावा अन्यथा जामीनदाराच्या प्रॉपर्टी जप्त करून कर्जाची परतफेड केली जाईल. सदर योजनेची मुदत दिनांक 30/ 6/ 23 पर्यंत असल्याने दिनांक 1 जुलै 2023 नंतर या योजने चा लाभ घेता येणार नाही. तरी बँकेच्या सर्व थकीत कर्जदारांनी व त्यांच्या जामीनदारांनी सध्या चालू असलेली 6% व्याज दराच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान करमाळा अर्बन बँकेचे प्रशासक दिलीप तिजोरे यांनी केले.