अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या तालुकाध्यक्षपदी ब्रह्मदेव नलावडे यांची निवड

करमाळा /संदेश प्रतिनिधी : अखिल भारतीय ग्राहक पंचायतची करमाळा तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात नुकतीच करण्यात आली आहे.त्यामध्ये तालुकाध्यक्षपदी ब्रह्मदेव दगडू नलावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

यात निवडलेली नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे …उपाध्यक्ष : श्री. चक्रधर विश्वनाथ पाटील,सचिव : श्री. अजीम गुलाम खान,कोषाध्यक्ष : सौ. नीलिमा अनिल पुंडे,तालुका कार्यकारिणी सदस्य म्हणून श्री. निलेश शंकरराव कुलकर्णी, श्री. संजय नारायण हांडे,श्री. रमेश उध्दव शिंदे,श्री. आशपाक शौकत सय्यद, श्री. भिमराव सावळा कांबळे, श्री. शिवाजी कृष्णाजी वीर, श्री. शशिकांत मुरलीधर नरुटे
विशेष निमंत्रित सदस्य :
सौ. ललिता शिवशंकर वांगडे (जिल्हा कोषाध्यक्ष),श्री. भिष्माचार्य लक्ष्मण चांदणे (जिल्हा प्रबोधन प्रमुख)सौ. माधुरी राजेंद्र परदेशी (जिल्हा महिला प्रमुख)

जिल्हा अध्यक्ष श्री. शशिकांत हरिदास यांनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



