शाखाधिकारी राजेंद्र रणसिंग यांची सोलापूर येथील जिल्हा बॅंकेत बिगरशेती कर्ज विभाग प्रमुखपदी निवड... - Saptahik Sandesh

शाखाधिकारी राजेंद्र रणसिंग यांची सोलापूर येथील जिल्हा बॅंकेत बिगरशेती कर्ज विभाग प्रमुखपदी निवड…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे टाकळी (ता.करमाळा) येथील शाखेचे शाखाधिकारी राजेंद्र रणसिंग यांची पदोन्नतीवर सोलापूर येथील जिल्हा कार्यालयात बिगरशेती कर्ज विभाग प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. श्री. रणसिंग हे मुळ खातगाव येथील रहिवाशी असून, जिल्हा बँकेत २ मे १९८८ ला क्लार्क म्हणून जेऊर येथे कार्यरत झाले.

त्यानंतर करमाळा, चिखलठाण, केत्तूर, पारेवाडी, साडे, टाकळी या शाखांमध्ये त्यांनी आत्तापर्यंत ३५ वर्षे सेवा केली आहे. क्लार्क, कॅशिअर, शाखाधिकारी, बँक निरीक्षक या पदावर त्यांनी काम केले आहे. नुकतीच त्यांची पदोन्नती झाली असून येत्या १६ ऑक्टोबर पासून सोलापूर येथील जिल्हा बँक कार्यालयात कार्यरत होणार आहेत. त्यांना मिळालेल्या पदोन्नतीबाबत ग्रामसुधार समिती व संदेश परिवाराकडून विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!