केम येथे ज्वेलरीचे दुकान फोडून दीड लाखांची चोरी – इतर दोन ठिकाणी घरफोडी
करमाळा (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम येथे पाच सप्टेंबरच्या रात्री घराला कुलूप असल्याची संधी साधत दोन ठिकाणी घर फोडी झाली आहेत तसेच रात्री बंद केलेल्या एका ज्वेलरी दुकानाचे कुलूप तोडून सुमारे दीड लाखांची चोरी झाली आहे.
या विषयी ज्वेलरी दुकानाचे मालक किशोर सुरेश पंडीत (वय 44 वर्ष) यांनी फिर्याद दिली आहे.दिवसभर दुकानात काम करून ५ सप्टेंबर ला रात्री ९ च्या सुमारस माझे दुकान बंद करून घरी गेलो. घरातील आम्ही जेवण करून रात्री बसलो होतो. रात्री 10.00 वाचे सुमारास आमच्या गावातील आनंद मकरंद शिंदे यांनी फोन वरून मला सांगितले की, त्यांचे मामा अर्जुन रणदिवे यांना सांगा की, गावात चोर आले आहेत. तुम्ही सावध राहा असे मला फोनवर सांगितल्यानंतर मी अर्जुन रणदिवे यांच्या घराकडे गेलो. तिथे त्यांच्या घराचा कडी कोयंडा तुटलेला दिसला. त्यानंतर मी व माझे मित्र उत्तरेश्वर रामचंद्र तळेकर व नागराज अर्जुन तळेकर असे आम्ही मिळुन माझ्या दुकानाकडे आलो असता माझ्या दुकानाचा कडी कोयंडा देखील तुटलेचा दिसला. त्यानंतर मी माझ्या दुकानात आत जावुन पाहिले असता काय चोरीस गेले आहे. माझे दुकानातुन चोरीस गेलेल्या मालाचे वर्णन पुढीलप्रमाणे
- 1)22,750/- रू किंमतीचे वनज 325 ग्रॅम 25 नग चांदीचे करदुडे जु.वा. किं.अं.
- 2) 52,500/- रू किंमतीचे 750 ग्रॅम वजनाचे 30 नग चांदीचे जोडवी जु.वा. किं. अं.
- 3) 22,050/- रू किंमतीचे 315 ग्रॅम वजनाचे 35 नग चांदीचे फॅन्सी जोडवे जु. वा. किं. अं.
- 4 ) 14,700/- रू किंमतीचे 210 ग्रॅम वजनाचे 3 नग चांदीचे पैंजन रिपेअरींग करणेसाठी आले होते.
- 5) 40,000/- रू किंमतीचे 8 ग्रॅम वजनाचे 1 नग फुले, झुबे सोन्याचे ( कोयमतुर) जु.वा. किं.अं.
- असा एकूण 1,52,000/- रू चा ऐवज चोरट्यांनी चोरला आहे.
थोड्या वेळाने मला असे समजले की, अर्जुन रणदिवे यांच्या घरा बरोबरच सागर पवार यांचेदेखील घर फोडले आहे. त्या दोघांचे घरी कोणीही नव्हते. याविषयी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने करीत आहेत.