व्यापारी शरदचंद दोशी यांचे निधन..

करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.30) : येथील व्यापारी शरदचंद नेमचंद दोशी (वय-75) यांचे अल्प अजाराने आज (ता.30) पहाटे रहात्या घरी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे.
अतिशय मनमिळाऊ व सर्वांना मदत करण्याचा स्वभाव होता. सतत हास्यमुर्ती म्हणून त्यांची ओळख होती. गेल्या दीड वर्षांपासून ते आजारी होते. आज पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांचे जेऊर येथे मेडिकल तर करमाळा येथे किराणामालाचे दुकान आहे.
प्रितम दोशी व शितल दोशी यांचे ते वडील होते. आज (ता.30) दुपारी 12-15 वाजता त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.