करमाळ्यात लग्नासाठी आले आणि देवस्थानला देणगी देऊन गेले
करमाळा (दि.२९) – करमाळा शहरातील प्रसिद्ध व्यापारी विठ्ठलराव सावंत यांच्या मुलाच्या लग्नासाठी एक व्यक्ती पाहुणे म्हणून आले आणि जाताना त्यांनी कमलाभवानी देवी देवस्थानला 21 हजाराची देणगी दिली आहे.
करमाळा येथील सावंत यांच्या लग्नासाठी विठ्ठलराव सावंत यांचे ज्येष्ठ बंधू माजी समाज कल्याण अधिकारी गोपाळराव सावंत यांचे मित्र यावेळी आले होते. त्यावेळी त्यांना गोपाळराव सावंत यांनी कमलादेवी देवस्थानच्या दर्शनासाठी घेऊन गेले. यावेळी कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धन या कामाची माहिती मिळाली. मंदिर संवर्धनाचे सध्याचे चालू असलेले काम त्यांना आवडल्यानंतर त्यांनी तातडीने 21 हजाराची देणगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे यांच्याकडे सुपूर्द केली. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांनी माझ्या नावाची कोठेही वाच्यता होणार नाही याची दक्षता घ्या असे सांगितले. म्हणजे नाव न सांगता देवस्थानसाठी गोपाळराव सावंत यांचे मित्रांनी 21 हजाराची देणगी दिलेली आहे आणि अशा पद्धतीने देवस्थान देणगी मिळत असल्याने देवस्थानचं काम चांगल्या पद्धतीने होत आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे यांनी दिली.
तरी तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींनी यापुढेही देवस्थानच्या कामासाठी करोडो रुपये खर्च येत असल्याने आपण जास्तीत जास्त निधी द्यावा आणि हे काम करण्यासाठी सहकार्य करावे असेही आवाहन श्री सोमनाथ चिवटे यांनी केलेले आहे.
माझे मित्र हे माझ्या भावाच्या मुलाच्या लग्नासाठी करमाळ्याला आले होते आणि सहज त्यांना मी देवस्थानचे दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये घेऊन गेलो. त्यांनी मंदिरातील सर्व पाहणी केली आणि मंदिरातील पाहणी केल्यानंतर त्यांना जे नव्याने मंदिर संवर्धनाचे सुरू आहे ते काम त्यांना खूप भावलं आणि त्यांनी माझ्याजवळ या देवस्थानसाठी देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी मी तातडीने संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे यांच्याशी संपर्क साधला आणि मग त्यांना माझे मित्र अशी देणगी देत आहे त्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यावेळी माझे मित्र आणि 21 हजार रुपयाची देणगी दिलेली आहे आणि या गोष्टीचा मला निश्चितच आनंद आणि अभिमान आहे.
– गोपाळराव सावंत, सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी करमाळा