करमाळ्यात फोटोग्राफर असोसिएशनमार्फत पालखीतून कॅमेऱ्याची मिरवणूक.. - Saptahik Sandesh

करमाळ्यात फोटोग्राफर असोसिएशनमार्फत पालखीतून कॅमेऱ्याची मिरवणूक..

करमाळा (दि.२०) – करमाळा शहरामधे जागतिक छायाचित्र दिनानिमित्त फोटोग्राफर बांधवाच्या वतीने पालखीतून कॅमेऱ्याची मिरवणूक काढण्यात आली.शहरातील सर्व महापुरुषांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करत व कुंडीतील रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी कॅमेऱ्याचे पूजन केले.


यावेळेस प्रा. करे-पाटील म्हणाले की, छायाचित्रण हा छंद किंवा व्यवसाय म्हणून जोपासला जात असला तरी त्यासाठी कलात्मक दृष्टी आवश्यक असते. सध्या व्यावसायिक छायाचित्रकारासाठी मोबाईल स्पर्धक ठरत असल्याचे चित्र आहे.करमाळा शहरामधे जागतिक छायाचित्र दिनानिमित्त फोटोग्राफर बांधवाच्या वतीने पालखीतून कॅमेऱ्याची मिरवणूक काढून त्यांनी आपल्या व्यवसायाप्रती कृतज्ञता व्यक्त करत नवा आदर्श समाजासमोर उभा केला आहे.


प्रा.गणेश करे-पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर पुणे फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष अभय कापरे, पुणे फोटो फेअरचे आयोजक सुमित जैन, दौंड तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे राजेंद्र खैरे,दौंड तालुका फोटोफेअरचे आयोजक व अध्यक्ष सचिन गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त करत उपस्थितांना आदर्श व्यावसायिकता निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन केले.

करमाळा तालुका फोटोग्राफर्स अँड व्हिडीओ ग्राफर्स असोसिएशनचे सदस्य योगेश ठोंबरे, सुधीर चोपडे, मनोज ढेरे, राज मुसळे, ओंकार कदम, महेंद्र मांडगे, राज मुसळे, देविदास कोठावळे,अनिकेत राऊत, गणेश इरकर,निलेश चांदगुडे, देविदास कोठावळे, लखन कोठावळे,सुनील जगताप, नागनाथ सातपुते, प्रवीण वीर, ऋषिकेश अमरुळे, बापू पवार, बाळु सलगर, राज झिंजाडे, दादा गाडे, प्रमोद वैद्य, अनिल शेंडे,गणेश गलांडे आणि उपस्थित फोटोग्राफरचे कुटुंबीय आदि मान्यवर पालखी सोहळ्यात सहभागी झाल्याने कार्यक्रमाची शोभा वाढली. आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.उपस्थितांचे स्वागत निलेश विधाते यांनी केले तर बबन आरणे यांनी प्रास्ताविक करत कार्यक्रमाची दिशा सांगितली.अमृता आरणे यांनी सूत्रसंचालन केले तर नागेश सातपुते यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!