दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या शेलगाव वांगी येथे कँडल मार्च

करमाळा(दि.३): पहेलगाम, काश्मीर येथे हिंदूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शेलगाव- वांगी येथे कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण समाज व्यथित असून, शहीद झालेल्या नागरिकांप्रती सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.हा कँडल मार्च रविवार, ४ मे रोजी सायंकाळी ७ वाजता शेलगाव चौक, वांगी येथे होणार आहे. यावेळी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल.
या कार्यक्रमासाठी शिवसेना व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व देशप्रेमी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः शिवसेना नेते दिग्विजय बागल व भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल हे उपस्थित राहणार आहेत.






