‘मराठा आरक्षणासाठी’ शेटफळकरांचा कॅंडल मोर्चा – शेकडो नागरीक कॅंडल घेवून रस्त्यावर – मराठा आरक्षणाच्या घोषणांनी परिसर दुमदुमला..


करमाळा / संदेश प्रतिनिधी :

शेटफळ (ना) : मराठा समाजाला कुणबी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्यासह महाराष्ट्रात याच मागणीसाठी ठिक ठिकाणी सुरू असलेल्या उपोषणाला बसलेल्या सर्वांच्या समर्थनार्थ शेटफळ (ता करमाळा) येथील सकल मराठा समाजाच्यावतीने ३१ आक्टोबर मंगळवार‌ रोजी सायंकाळी सात वाजता कॅंन्डल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला शेकडो नागरिक उपस्थित होते.

शेटफळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून स्मारकापासून निघालेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने लहान मुले,महिलांसह तरूण व वृद्धांचा समावेश होता, नागनाथ मंदिर, ग्रामपंचायत कार्यालयात कडून संपुर्ण गावात फेरी मारण्यात आली ‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’, ‘जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है’ या घोषणांनी परिसर दुमदुमूला होता.

याप्रसंगी संध्याराणी लबडे या शालेय विद्यार्थ्यांनीच्या उत्साही वातावरणात भाषणाने या कॅंडल मोर्चाची सांगता करण्यात आली. या या मोर्चात गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्षसह सर्व सदस्य, गावातील सर्व तरूण मंडळाचे कार्यकर्ते व सर्व‌समाजातील लोकांचा सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!