डोळे येणे – संसर्गजन्य आजारापासून घ्यावयाची काळजी..
डोळे येण्याची लक्षणे… १) डोळ्याचा रंग गुलाबी/लाल होणे २) डोळ्यातून वारंवार पाणी, स्त्राव येणे ३) डोळ्यांना खाज सुटणे ४) डोळ्यांची जळजळ होणे गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत होणाऱ्या बदलाने राज्यात डोळे येणे ही साथ सुरू आहे. डोळे येणे हा एक संसर्गजन्य आजार आहे. विशेषतः पावसाळ्यात हा आजार पसरतो. हा आजार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होत असल्याने त्याचे प्रमाण वाढत आहे. ५) डोळे जड येणे ६) डोळ्यांना प्रकाश व हवा सहन न होणे ७) दृष्टी धुसर होणे ८) डोळ्यांना सुज येणे.
प्रतिबंधात्मक उपाय… १) वेळोवेळी हात स्वच्छ धुवा २) डोळ्यांना स्वच्छ पाण्याने धुवा ३) पुन्हा पुन्हा डोळ्यांना स्पर्श करू नका ४) कुटूंबाच्या संपर्कात राहणे टाळा ५) घराबाहेर जाताना गॉगल वापरा ६) कॉन्टॅक्ट लेंस वापरणे टाळा ७) गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा ८) संक्रमित व्यक्तीचे टॉवेल, रूमाल कपडे, मोबाईल, बेड वापरणे टाळा. ९) आपला परिसर स्वच्छ ठेवा १०) संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्ञाचा सल्ला घ्यावा व त्यानुसार औषधोपचार करावे.
या संसर्गजन्य आजारात व्यवस्थित काळजी घेतल्यास डोळ्यांना आजार होत नाही आणि झाल्यास लक्षणापासून ३-६ दिवसात आराम मिळतो. ..डॉ.भाग्यश्री रामकृष्ण नायकुडे (नेत्रतज्ञ व शल्य चिकित्सक)