जमिनीच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण - Saptahik Sandesh

जमिनीच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : जमिनीच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करून चौघांनी एकास बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार १७ ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजता वडशिवणे येथे घडला आहे. या प्रकरणी सोमनाथ वामन काकडे (रा. वडशिवणे) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की १६ ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजता आमच्या शेतात चंद्रकांत गोडसे हा जनावरे चारताना पाहिला व त्यास तु पिकाचे नुकसान का करतो असे म्हणाले असता त्याने मला जातीवाचक शिवीगाळ केली व उद्या तुझ्याकडे पाहतो.. असे म्हणाला. त्यानंतर १७ ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजता मी एसटी स्टॅन्डवर वर्तमान पत्र वाचण्यास गेलो असता, तेथे चंद्रकांत गोडसे, कृष्णाजी मोरे, लक्ष्मण मोरे व ज्योतीराम काळे (सर्व रा. वडशिवणे) आले व भांडण मिटवू म्हणून श्रीमंत कवडे यांच्या पंक्चर दुकानासमोर नेले. त्यावेळी त्यांनी पंक्चर दुकानातील लोखंडी टॉमी घेऊन माझ्या डाव्या पायावर मारली व शिवीगाळ करून दमदाटी केली. जातीवाचक शब्द वापरून तुमची जमीन घेतल्याशिवाय तुझी सुट्टी नाही असे म्हणून पुन्हा काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपअधिक्षक अजित पाटील हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!