जातपडताळणी प्रकरण प्रलंबितांनी मंगळवारी सोलापूर कार्यालयात हजर राहावे – सकल मराठा समाजाचे आवाहन

करमाळा (दि. ३): ज्यांची जातपडताळणी प्रकरणे प्रलंबित आहेत, अशा सर्व मराठा बांधवांनी आपले मूळ कागदपत्रे तसेच प्रकरण दाखल करतानाची पोहोच घेऊन दिनांक ५ ऑगस्ट २०२५, मंगळवार रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत जातपडताळणी कार्यालयात हजर राहावे, असे आवाहन सकल मराठा समाज, करमाळा यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे म्हणाले की, ही संपूर्ण प्रक्रिया सोलापूर येथील सकल मराठा समाजाचे माऊली पवार व सहकारी यांच्या पुढाकाराने राबवण्यात येणार आहे.
करमाळा परिसरातील मराठा समाज बांधवांनी आपली प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी याठिकाणी वेळेत उपस्थित राहावे, आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करणार आहोत.




