नागरिकांच्या सुरक्षेसाठी डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशनच्यावतीने बसविले करमाळ्यात सी सी टीव्ही कॅमेरे..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातील सामाजिक सेवेत अग्रेसर असणारी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा यांनी नागरिकांनाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून करमाळा शहरातील विविध भागात सी सी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, यावर या भागातील महिला नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

करमाळा शहरातील मोहल्ला गल्ली, माळी गल्ली, दगडी रोड ,किल्ला विभाग रोड कडे जाणारे रस्ते व भोवतालचा परिसरात तसेच माॅं आयशा मस्जिद व दत्त मंदिर परिसर या धार्मिक स्थळाला सी सी टीव्ही कॅमेरे बसवून नागरिकांच्या होणारे चो-या पासुन व इतर अप्रिय घटनां घडण्यास रोखले जावे म्हणून हा संपूर्ण परिसर सी सी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

या संपूर्ण परिसरात सी सी टीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे परिसरातील नागरिकांनी व खास करून महिला वर्गाने समाधान व्यक्त केले आहे व भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन व त्यांच्या सर्व सहका-याच या कामाबद्दल कौतुक केले आहे. करमाळा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी सीसीटीव्ही कॅमेरा चे लोक अर्पण केले. याप्रसंगी या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी सांगितले की, शहरातील एखाद्या परिसरात सी सी टीव्ही कॅमेरे बसविण्याचा हा पहिलाच उपक्रम असून सीसीटीव्ही कॅमेरे हे आपल्या सभोवताली भागात बसविणे ही काळाची गरज आहे यामुळे अनेक धोके व अप्रिय घटना टाळण्यासाठी मदत होते, चोरी व दरोडेचे प्रमाणात वाढ झाली आहे त्याला सी टीव्ही कॅमेरे च्या माध्यमातून आळा घातला जावु शकतो. विधान परिषदेचे भाजपाचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी या परिसरात सी सी टीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे समाधान व्यक्त केले व संस्थेचे व सर्व सहका-यांचे या उपक्रमाबद्धल कौतुक केले.

यावेळी माजी आमदार नारायण आबा पाटील , मुस्लीम समाजातील समाजसुधारक व विचारवंत मा. कलीम काझी सर, अशपाक भाई सय्यद पत्रकार, आलीम भाई शेख पत्रकार, युवक नेते आझाद शेख, यावेळी संस्थेचे चे संस्थापक अध्यक्ष समीर शेख, सचिव पिंटु शेठ बेग, जामा मस्जिद चे विश्वस्त अध्यक्ष जमीर भाई सय्यद, उपाध्यक्ष जहाँगीर बेग,फिरोज बेग, इमत्याज पठाण, इंदाज वस्ताद,जिलाणी पठाण , दिशान कबीर, माजित शेख, अरबआज बेग, अकिल शेख, सलीम शेख,इस्त्रायल शेख उपस्थित होते कार्यक्रमच्या शेवटी संस्थेचे सचिव पिंटु शेठ बेग यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!