करमाळ्यात ‘श्रीराम मंदिरास’ एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशनकडून सीसीटीव्ही कॅमेरे..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : येथील डॉ.एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशन व मुस्लिम समाज यांचे वतीने वेताळपेठ येथील श्रीराम मंदिरास सीसीटीव्ही कॅमेरे दिले आहेत. या कॅमेरेचे वितरण ज्येष्ठ पत्रकार व संत साहित्याचे अभ्यासक ॲड. डॉ. बाबूराव हिरडे यांचे हस्ते करण्यात आले.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशनच्या वतीने पोलीस कॉन्स्टेबल समीर शेख यांच्याकडून सीसीटीव्ही कॅमेरे कीट देण्यात आले आहे. मुस्लिम समाजाकडून हिंदू मंदिरास ही दिलेली भेट म्हणजे करमाळा शहरातील हिंदूमुस्लिम बांधवांचे असलेले ऐक्य व सामाजिक एकतेचे दर्शन घडले आहे. या उपक्रमाचे शहरातील विविध संस्थांनी तसेच अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशनचे अभिनंदन केले आहे.
यावेळी श्रीराम मंदिर व्यवस्थापन समितीचे विजय देशपांडे, दर्शन कुलकर्णी, प्रसिध्द व्यापारी राधेशाम देवी, ज्येष्ठ नागरीक श्रीधर सुर्यपुजारी, व्यापारी भारतशेठ वांगडे, विवेक देशपांडे, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष आझाद शेख, जामा मस्जिद विश्वस्त अध्यक्ष जमीर सय्यद, डॉ. एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशनचे उपाध्यक्ष जहांगिर बेग तसेच अलिम खान, दिशान कबीर आदीजण यावेळी उपस्थित होते. यावेळी सचिव रमजानभाई बेग यांनी आभार मानले.