केडगाव शाळेत शालेय साहित्य वाटप करून आमदारांचा वाढदिवस साजरा

करमाळा(दि.२४):आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प. प्रा. शाळा, केडगाव येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. श्री. नारायण (आबा) पाटील मित्र मंडळ, केडगाव यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना वह्या, पॅड व लेखनसामग्रीचे वाटप करण्यात आले.

हार, फेटे, बॅनर यासारखा अनावश्यक खर्च टाळून शालेय साहित्य वाटप केल्यामुळे या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शैक्षणिक गुणवत्तेला चालना मिळण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, अशी भावना पालकांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास विविधकारी सोसायटी, केडगावचे चेअरमन पांडुरंग बोराडे, वैभव बोराडे, शिवाजी गायकवाड, शिवाजी बोराडे, सुरज बोराडे, पांडुरंग फरतडे, नाना लगस, रवी शिंदे, नितीन डोळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



