केममध्ये बैल पोळा उत्साहात साजरा -

केममध्ये बैल पोळा उत्साहात साजरा

0

केम(संजय जाधव) : श्रावण महिन्यातील शेतकऱ्यांचा आनंदाचा सण मानला जाणारा श्रावणी बैलपोळा गावागावांत उत्साहात साजरा होत असतानाच, केम येथील श्री ऊत्तरेश्वर मंदिर व गोमाता मंदिर या ठिकाणी हा सण उत्साहात साजरा करण्यात आला.

ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर मंदिरात महादेवाच्या नंदीची भव्य सजावट करून विधीवत पूजा करण्यात आली. मंदिर परिसरात भक्तांचा जल्लोष अनुभवायला मिळाला. या वेळी राहुल कोरे, सचिव मनोज सोलापूरे, महंत जयंतगिरी गिरी महाराज, उद्योगपती आप्पा वैद्य, संजय दौंड, बलभिम दौंड, ब्रह्मदेव दौंड, कृष्णा गुरव, बालाजी आवताडे, महादेव तळेकर, शंकर देवकर, मनोज दौंड, निलेश धर्मराज नागणे आदींसह अनेक भाविकांनी उपस्थित राहून पोळा उत्सवाचे महात्म्य जपले.

केम येथील गोमाता मंदिरात तब्बल पंचवीस गोवंश आहेत. त्यामुळे या ठिकाणी दरवर्षी बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बैल पोळ्याच्या निमित्ताने गोसेवक परमेश्वर तळेकर व त्यांच्या परिवाराने आपल्या गाई व बैलांना स्वच्छ धुवून छान सजविले. गळ्यात माळा, पायात पैंजणासारखे घुंगरू, शिंगांना रंगीबेरंगी रंग देऊन  सजविण्यात आले होते. बैल व गायींचे प्रतीकात्मक लग्नसोहळा पार पडला. यानंतर गायी-बैलांना पुरणपोळी खाऊ घालण्यात आली.

यावेळी विजय वनवे, भारती वनवे, राजेंद्र दोंड, मनिषा दोंड, बाबुराव तळेकर, ज्ञानदेव तळेकर, रेखा तळेकर, सुनिता तळेकर, संजिवनी तोबरे, चांगदेव तळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!