रावगाव येथील राजीव गांधी सार्वजनिक वाचनालयात भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा

करमाळा : भारतीय संविधानाच्या स्वीकृतीला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय, रावगाव येथे भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक विजयरााव कोळेकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या प्रस्ताविकेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या वेळी “संविधान हे केवळ कायद्यांचे संहितिकरण नसून कोट्यवधी भारतीयांच्या आशा आणि आकांक्षा प्रतिबिंबित करणारा पवित्र दस्तऐवज आहे,” असे प्रतिपादन मुख्याध्यापक विजयराव कोळेकर यांनी केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संविधान प्रस्ताविकेच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले तसेच सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे प्रस्ताविका वाचन केले.

कार्यक्रमास पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे शिक्षक किरण परदेशी, हनुमंत रासकर, पप्पू राठोड, रुपेश मोरे, विलास पाटील, अॅड. सुहास कानगुडे, सरडे, तसेच ग्रामस्थ ज्ञानेश्वर पवार, राहुल पवार, प्रकाश कांबळे, भास्कर पवार आणि विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.


