पांडे येथील ज्येष्ठ नागरिक चांद बाबूलाल मुजावर यांचे निधन..

करमाळा/संदेश प्रतिनिधी : पांडे (ता. करमाळा) येथील ज्येष्ठ नागरिक चांद बाबूलाल मुजावर (वय 80) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले , सुना नातवंडे असा परिवार आहे. ते पत्रकार दस्तगीर मुजावर यांचे वडील होत. चांद मुजावर हे अत्यंत मनमिळाऊ, समाजप्रिय स्वभावाचे होते. गावामधील अनेकांच्या अडचणीच्या प्रसंगी ते नेहमी मदतीला धावून जात असत. त्यांचा गावातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातही मोठा सहभाग होता. त्यांच्या निधनाने मुजावर परिवारावर तसेच पांडे गावावर शोककळा पसरली आहे.