विभागीय अबॅकस स्पर्धेत केमच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश -

विभागीय अबॅकस स्पर्धेत केमच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

0

केम(संजय जाधव):सोलापूर व धाराशिव विभागीय अबॅकस स्पर्धा तामलवाडी येथे पार पडली. या स्पर्धेत केम येथील स्मार्टअस अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत संपूर्ण विभागात केमचे नाव उज्ज्वल केले.


या स्पर्धेसाठी सोलापूर व धाराशिव विभागातून सुमारे ३०० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी केम केंद्रातील ३८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व ट्रॉफी प्रदान करण्यात आली. पारितोषिक वितरण स्मार्टअस एज्युकेशन प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र शेलार आणि स्मिता शेलार यांच्या हस्ते पार पडले.

स्पर्धेतील विविध गटांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
ग्रेड ‘ए’ मध्ये
A1 गटात राजवीर अजित टकले,
A2 गटात हिंदवी श्रीकांत जाधव,
A3 गटात सिद्धी नितीन तळेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.


ग्रेड ‘बी’ मध्ये मानसी दत्तात्रय चव्हाण हिने प्रथम क्रमांक मिळवून विशेष यश संपादन केले.तसेच

A1 गटात स्वरांजली नारायण तोणपे,
A2 गटात अभिनव अरुण उघडे,
A3 गटात औदुंबरी गणेश पळसे यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

A2 गटात प्रगती विष्णू सुरवसे व A3 गटात मेघराज दीपक देवडकर यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला, तर A2 गटात शिवम वासुदेव तळेकर याने पाचवा क्रमांक पटकावला.


या यशासाठी स्मार्टअस अबॅकस क्लासेस, केम सेंटरच्या संचालिका सोनल कुलकर्णी व शिक्षिका प्रियांका ओहोळ यांनी विद्यार्थ्यांची नियोजनबद्ध तयारी करून घेतली. तसेच पालकांच्या सातत्यपूर्ण पाठिंबा व सहकार्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून हे यश साध्य झाल्याचे नमूद करण्यात आले.


विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल नूतन जिल्हा परिषद सदस्य कल्याणी तळेकर, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर बिचितकर, अजित तळेकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार, श्री.सावंत, सुदर्शन तळेकर आणि पत्रकार संजय जाधव यांनी अभिनंदन केले आहे. स्मार्टअस अबॅकस क्लासेसच्या या यशाचे केम व परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!