करमाळा येथील आंबेडकरवादी चळवळीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

करमाळा : छत्रपती संभाजी महाराज यांच्या १४ मे रोजी असलेल्या जयंतीनिमित्त करमाळा शहरातील आंबेडकरवादी चळवळीच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

हा कार्यक्रम शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पार पडला. या कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे, शिवधर्म प्रसारक भिमराव लोंढे, छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती रंभापुरा च्या सर्व पदाधिकारी यांचा सत्कार आंबेडकरीवादी चळवळीच्या वतीने करण्यात आला. यावेळी डॉ. आंबेडकरवादी चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!