छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त केममध्ये आरोग्य शिबिरासह सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत -

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त केममध्ये आरोग्य शिबिरासह सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत

0

केम(संजय जाधव): करमाळा तालुक्यातील केम येथे श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १४ मे ते १८ मे दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळा समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

कार्यक्रमाचे तपशील पुढीलप्रमाणे —

  • दि. १४ मे : रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर व आधार कार्ड कॅम्प
  • दि. १५ मे : शाहिर कृष्णात पाटील (कोल्हापूर) यांचा शिवचरित्रावर आधारित पोवाडा सादर
  • दि. १६ मे : हिंदू धर्मप्रसारक युवा कीर्तनकार ओम महाराज अटकळ यांचे “शिवशंभू” या विषयावर कीर्तन
  • दि. १७ मे : शिवकालीन वेशभूषा व शस्त्रप्रदर्शन तसेच स्वराज्य मर्दानी आखाडा संस्थापक अक्षय तळेकर यांचे सादरीकरण
  • दि. १८ मे : सर्व रोग निदान शिबिर (यशश्री हॉस्पिटल, टेंभुर्णी यांच्या सौजन्याने)
  • दि. २१ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य पारंपरिक मिरवणूक काढण्यात येणार आहे.

या मिरवणुकीत रेणुका देवी साउंड, दोस्ती म्युझिक बँड, गजा ढोल पथक, बॅन्जो पार्टी (परळी वैजनाथ, बीड), श्री उत्तरेश्वर हलगी ग्रुप (केम), बजरंग बली देखावा (कुर्डूवाडी), जॅक्सन हलगी व लेझीम पथक (बाभळगाव), स्वराज्य मर्दानी खेळ आखाडा (केम व कन्हेरगाव), ए.एस. फायर पेपर ब्लास्टर फेम यांचा सहभाग असेल. यावेळी भव्य शोभेचे दारूकामही करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी केम व परिसरातील शिवभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!