साहित्यिका रेश्मा दास यांच्या ‘सुमी” पुस्तकाचे छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते प्रकाशन…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : रोपळे (क) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारुढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचे औचित्य साधून त्या ठिकाणी सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका- रेश्मा दास लिखित चरित्रचित्रण ‘सुमी’ या पुस्तकाचे प्रकाशन छत्रपती संभाजीराजे कोल्हापूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
त्याचबरोबर रेश्मा दास यांच्या मातोश्री श्रीमती सुमन भिमराव दास यांना ‘राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार’ राजेंच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, पद्मश्री डॉ पोपटराव पवार, शिवसेना संपर्क प्रमुख संजय कोकाटे, माजी आमदार नारायण पाटील, राजकुमार मस्कर अध्यक्ष अ. भा. मराठा महासंघ इंदापूर, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, सविताराजे भोसले, तात्यासाहेब गोडगे माजी सरपंच रोपळे, अतुल दास शिवस्मारक समिती रोपळे व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.