छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाचा सामाजिक उपक्रम आदर्शवत – पोलीस निरीक्षक रणजीत माने यांचे प्रतिपादन.. -

छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाचा सामाजिक उपक्रम आदर्शवत – पोलीस निरीक्षक रणजीत माने यांचे प्रतिपादन..

0

करमाळा /संदेश प्रतिनिधी : देव, देश, धर्म, इतिहास याबरोबरच सर्वधर्म समभाव जपत समाजोपयोगी उपक्रम राबवणे हे छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ, सावंत गल्ली, करमाळा यांचे खरे वैशिष्ट्य आहे, असे मत  पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी व्यक्त केले.

गणेशोत्सवानिमित्त मंडळाने साकारलेल्या ऐतिहासिक “हिरकणीचे शौर्य” या देखाव्याचे उद्घाटन पो.नि.रणजीत माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. गजानन गुंजकर (उपजिल्हा रुग्णालय), राजेंद्र नेटके (तालुका कृषी अधिकारी), डॉ. हरिदास केवारे (संचालक आदिनाथ), ज्येष्ठ पत्रकार डॉ.ॲड.बाबुराव हिरडे, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना रणजीत माने म्हणाले, “७८ वर्षांची परंपरा लाभलेले हे मंडळ खऱ्या अर्थाने सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक सलोखा जोपासणारे आहे. डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्याची मंडळाची परंपरा कौतुकास्पद आहे. या मंडळाचा आदर्श घेणे ही काळाची गरज आहे.”

सावंत गटाचे नेते सुनील सावंत यांनी मंडळाच्या कार्याचा लेखाजोखा सादर केला. “गणेशोत्सवा बरोबरच रक्तदान, सर्व रोग निदान शिबिरे असे अनेक समाजोपयोगी उपक्रम आम्ही राबवतो. सर्व जातीधर्मातील लोक एक कुटुंब म्हणून या मंडळात कार्यरत आहेत. पोलिसांच्या बंदोबस्ताशिवायही आम्ही शिस्तबद्ध मिरवणूक यशस्वीपणे पार पाडतो,” असे ते म्हणाले.

आदिनाथ कारखान्याचे संचालक ॲड. राहुल सावंत यांनी, “आजोबा अनंतराव (आबा) सावंत व कै. सुभाष (आण्णा) सावंत यांच्या शिकवणीप्रमाणेच आमचे मंडळ आज सामाजिक सलोखा व उपक्रमशीलता जपत आहे. ज्येष्ठ मार्गदर्शकांचे आशीर्वाद आमच्या कार्याला दिशा देतात,” असे सांगितले. या कार्यक्रमात पो.नि. रणजीत माने, सुनील बापू सावंत, डॉ. गजानन गुंजकर, ॲड. राहुल सावंत यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत नगरसेवक संजय (पप्पू) सावंत यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संजय खारगे गुरुजी यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड.राहुल सावंत यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!