छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी साहील रोडे, उपाध्यक्षपदी अक्षय बनकर व शाबीर शेख

करमाळा : शहरातील सावंत गल्ली येथील छत्रपती शिवाजी तरुण मंडळाचे नवीन पदाधिकारी नुकतेच जाहीर झाले. सुनील बापू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवड प्रक्रियेत अध्यक्षपदी साहील रोडे, उपाध्यक्षपदी अक्षय बनकर व शाबीर शेख यांची निवड झाली.

याशिवाय कार्याध्यक्षपदी आदित्य देशमाने, मिरवणूक प्रमुखपदी अल्लाउद्दीन शेख, उपमिरवणूक प्रमुखपदी महेश अंधारे व लखन उबाळे, सचिवपदी ओमकार सावंत, सहसचिवपदी रविंद्र सुरवसे, खजिनदारपदी योगेश काकडे, सल्लागार म्हणून सुजित शेळके, तर संघटकपदी बंटी शिंदे यांची निवड करण्यात आली.

या प्रसंगी बोलताना सुनील बापू सावंत म्हणाले की, “मंडळाची स्थापना सन १९४७ मध्ये कै. अनंतराव आबा सावंत यांनी केली होती. पुढे हमाल पंचायतचे संस्थापक स्व. सुभाष अण्णा सावंत यांनी या परंपरेला बळ दिले. मंडळात सर्व समाजातील तरुणांना पदाधिकारी होण्याची समान संधी मिळते. गणेशोत्सवासह सर्व सण-उत्सव मंडळाच्या वतीने साजरे केले जातात. विशेष म्हणजे आमची मिरवणूक ही वर्षानुवर्षे विना पोलिस बंदोबस्त शांततेत पार पडत आहे.” या कार्यक्रमाच्या शेवटी आभारप्रदर्शन बापू उबाळे यांनी केले.

