विविध सामाजिक उपक्रम राबवत चुंग परिवाराकडून कियांशचा प्रथम वाढदिवस साजरा
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : चि.कियांश संदीप चुंग याच्या प्रथम वाढदिवसानिमित्ताने हॉटेल संगमचे मालक संदीप प्रदिप चुंग आणि चुंग परिवार यांनी श्री कमलाभवानी मंदिर जीर्णोद्धारकरणेकामी 21 हजारांची देणगी दिली असून, विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला.
कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या संयोजकाने श्री कमलाभवानी मंदीर जीर्णध्दाराच्या कामासाठी भाविकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन ट्रस्ट च्या माध्यमातून करण्यात आले होते या आव्हानास प्रतिसाद म्हणून चि.कियांश संदीप चुंग याच्या प्रथम वाढदिवसानिमित्त संदीप प्रदिपचुंग आणि चुंग परिवार यांचेकडून 21 हजारांची देणगी दिली आहे, यावेळी त्यांचा सत्कार श्री कमलादेवी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सुशिल राठोड, व्यवस्थापक अशोक गाठे, मंदिर पुजारी सचिन सोरटे, धनंजय सोरटे, रमेश येळवणे, यांनी सत्कार केला आहे.
तसेच चुंग परिवारातर्फे करमाळा शहरातील पांजरापोळ गो-शाळेत व मांगी रस्त्यावरील गुरूगणेश गो-शाळेत जनावरांना चारा वाटप करण्यात आला, तसेच श्रीदेवीचामाळ येथील मुकबाधिर शाळेत मुलांना खाऊ वाटप करण्यात आला, अशा पध्दतीने विविध उपक्रमाने कियांश चुंग याचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.