करमाळा नगरपालिकेसाठी १०६ कोटींचा प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश - Saptahik Sandesh

करमाळा नगरपालिकेसाठी १०६ कोटींचा प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा शहरासाठी केंद्र सरकारच्या अमृत जल २.० या योजनेअंतर्गत 50 कोटी सत्तावीस लाख रुपये नवीन पाणीपुरवठा योजनेचा सुधारित आराखडा तसेच भुयारी गटार योजनेसाठी 41 कोटी रुपये व सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी 15 कोटी असे मिळून 106 कोटी रुपयांचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगर विकास मंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत, अशी माहिती शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी प्रसार माध्यमांना दिली.

मुंबई येथील नंदनवन बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी भेट घेऊन या प्रकल्पाला तांत्रिक मंजुरी देण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगर विकास खात्याला दिले आहेत. यावेळी शिवसेनेचे सचिव संजय मोरे, पंढरपूर विभाग संपर्कप्रमुख महेश साठे, पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजी बाबर, शिवसेना शहरप्रमुख नागेश गुरव, हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर, सामाजिक कार्यकर्ते नासिर कबीर आदीजन उपस्थित होते.

करमाळा नगरपालिका भुयारी गटार योजनेचा प्रकल्पाची 41 कोटी रुपयांची योजनेचा आराखडा तयार झाला असून या योजनेला मान्यतेसाठी शासन दरबारी आडकाठी पडलेली आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार आगामी 50 वर्षाची लोकसंख्या डोळ्यापुढे ठेवून शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठीअमृत २.० योजनेतून 50 कोटी सत्तावीस लाख रुपयांचा नगरपालिकेने प्रस्ताव करून शासन दरबारी सादर केलेला आहे. तसेच सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी 15 कोटी रुपये असे या सर्व तिन्ही प्रकल्पाला तात्काळ तांत्रिक मान्यता द्यावी अशी मागणी काल जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली होती. या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नगरपालिका व नगरपंचायत हद्दीत हे प्रकल्प सुरू आहेत सोलापूर जिल्ह्यात सुद्धा सांगोला बार्शी येथे प्रकल्प मंजूर झाले आहेत मात्र करमाळा चा प्रकल्प सरकलेला आहे यासाठी सातत्याने गेली तीन महिन्यापासून प्रयत्न चालू होते
मुख्याधिकारी विनाताई पवार असताना हा प्रस्ताव शासन दरबारी दाखल झालेला होता आता या प्रकल्पाला गती मिळेल असा विश्वास आहे.

महेश चिवटे, शिवसेना ( शिंदे गट) जिल्हाप्रमुख, सोलापूर

प्रस्तावातील त्रुटी दूर करून तांत्रिक मंजुरीसाठी तात्काळ प्रस्ताव पाठवणार

करमाळा नगरपालिकेची मुख्याधिकारी बालाजी लोंढे म्हणाले की करमाळा शहरातील भुयारी गटार योजना व अमृत जल टू पिण्याची विस्तारित योजना पिण्याच्या पाण्याची विस्तारित योजना तसेच सांडपाणी स्वच्छता प्रकल्प यासाठी प्रस्ताव शासन दरबारी सादर केला असून यातील राहिलेल्या त्रुटी दुरुस्त करून प्रस्ताव नगर विकास खात्याकडे तात्काळ पाठवत आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार प्रस्ताव लवकर सादर करू

बालाजी लोंढे, मुख्याधिकारी करमाळा नगर परिषद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!