मुलांना संगणकाचे प्राथमिक ज्ञान शालेय जीवनातच मिळणे आवश्यक – कमोद देडे
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : आजच्या स्पर्धेच्या युगात संगणक शिक्षण काळाची गरज बनली असुन मुलांना संगणकाचे बेसिक ज्ञान शालेय जीवनातच मिळणे आवश्यक असल्याचे मत स्टेट बँकेच्या जेऊर शाखेचे शाखा व्यवस्थापक कमोद देडे यांनी जेऊर (ता.करमाळा) येथील लिटल एंजलस् स्कूल व अटल ज्ञान प्रबोधिनी या शाळेच्या संगणक कक्षाचे उद्घाटन कार्यक्रमात बोलताना केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष परेशकुमार दोशी होते .पुढे बोलताना देडे म्हणाले की ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जय मातृभुमी शैक्षणिक व सांस्कृतिक संघ या संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी यासाठी स्टेट बँकेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत शाळेला पाच संगणक संच उपलब्ध करून दिले आहेत याचा फायदा या मुलांना नक्कीच होईल.विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पुढील काळात ही सहकार्य राहील असे सांगितले.
यावेळी पत्रकार गजेंद्र पोळ यांनी संगणक शिक्षणाचे महत्त्व सांगत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांच्या संगणक शिक्षणासाठी संस्थेच्या वतीने होत असलेल्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . परेशकुमार दोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन मेहता यांनी केले तर आभार धनेश बलदोटा यांनी मानले यावेळी कृषी दिनानिमित्त शाळेसमोरील बागेत तुळशीच्या बियांचे रोपन करण्यात आले.या कार्यक्रमाला स्टेट बँकेचे उपव्यवस्थापक प्रदिप ठोंबरे संस्थेचे सचिव प्रसंन्न बलदोटा, उपाध्यक्ष परेशकुमार दोशी, जेऊर ग्रामपंचायत सदस्य संदीप कोठारी, सुभाष इंगोले,प्रकाश पोळ मुख्याध्यापक सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.