‘बिबट्या’ पुन्हा मांगी गावाजवळील नरसाळे वस्तीवर दिसल्याचा दावा – वनविभागावर नागरिकांची नाराजी..

प्रविण अवचर यांजकडून…
करमाळा : गेल्या ४ ऑगस्टपासून बिबट्या करमाळा तालुक्यातील मांगी परिसरात फिरत आहे, तसेच जवळच असेलेले पोथरे, कामोने, शिवारामध्ये बिबट्याचा वावर दिसून येत आहे, त्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेवून फिरावे लागत आहे, या सर्व परिस्थितीत मांगी गावातील नागरिकांमध्ये भीतीचे असून, वनविभागाच्या बिबट्याला पकडण्याच्या अपयशावरती ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आजपर्यंत या बिबट्याने चार ते पाच जनावर हल्ला केला असून त्यांना फस्त केले आहे, हा बिबट्या रविवारी (ता.१३ ऑगस्ट) मांगी गावालगत नरसाळे वस्ती जवळ दिसून आलेला आहे. गेल्या आठ-दहा दिवसापासून वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी ‘बिबट्या’चा वावर असणारे परिसरात पिंजरा लावलेला आहे. बिबट्या मात्र त्यांच्या हाती लागत नाही.
शेतकरी शेतामध्ये जायला घाबरत असून.. आजूबाजूच्या परिसरात बिबट्या येऊ नये म्हणून गावांमधील नागरिक मोठ्या आवाजाचे फटाके वाजवत आहेत. या बिबट्याला लवकरात लवकर जेर बंद करावे अशी मांगी व परिसरातील ग्रामस्थांची प्रशासनाकडे वारंवार मागणी होत आहे.
“आमदार संजयमामा शिंदे यांच्या सूचनेनुसार वनविभाग कर्मचारी व त्यांची यंत्रणा रात्रंदिवस काम करत असून ते लवकरच बिबट्याला जेर बंद करतील, तरी मांगीसह परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी आपली काळजी घ्यावी तसेच वनविभाग कर्मचाऱ्यांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुजिततात्या बागल यांनी केलेले आहे”





