करमाळा शहरातील जडवहातूक बंद करा- नागरिकांची मागणी

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२१ : करमाळा शहरातील रस्ते अरूंद आहेत, त्यातच हातगाडीवाले, दुचाकीस्वार व चारचाकी वाहने यांची गर्दी असतानाच
रस्त्यावर मालवहातुकीची वाहणे आली की रस्ता बंद पडतो व नागरिकांना रस्त्यावरून चालताही येत नाही. त्यामुळे पालिकेने शहरातील जड वाहनाची वहातूक बंद करावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.
करमाळा शहरात सतत मोठमोठी जड वाहतुकीची वाहने येतात. त्यामुळे रस्त्यावर कायम गर्दी होते. मोठी वाहने रस्त्यावर तासनतास उभी राहतात, तसेच चौकात ती वाहने वळत नाहीत, त्यामुळे मोठी वहाने वळवण्यात वेळ जातो. दरम्यान दुसरी वाहने अडकून पडतात व रस्ता पूर्ण बंद पडतो. नागरिकांना यामध्ये चालताही येत नाही व प्रदूषणाला सामोरे जावे लागते. अशा स्थितीत शहरातील जड वाहतूक पुर्णपणे बंद करावी, अशी करमाळा शहरातील नागरिकांकडून मागणी होत आहे.


