केममधील नेत्रतपासणी शिबिरात २०० नागरिकांची तपासणी; सवलतीत चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत

केम(संजय जाधव) : ग्रामपंचायत केम व बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालयात २० जुलै रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन श्री उत्तरेश्वर देवस्थानचे महंत जयंतगिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले.

या शिबिरात संगणकीकृत यंत्रांद्वारे नेत्र तपासणीसह मोतीबिंदूची विशेष तपासणी करण्यात आली. एकूण २०० नागरिकांनी तपासणीचा लाभ घेतला. शिबिरात सवलतीच्या दरात चष्मे वाटप करण्यात आले, तर मोतीबिंदू शस्त्रक्रिया बुधराणी हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे.

शिबिरामध्ये डॉ. अक्षय ताकवले, अजित जाधव व प्रशांत जगताप यांनी तपासणी सेवा दिली. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.


उद्घाटनप्रसंगी राहुल कोरे, माजी सरपंच अजितदादा तळेकर, माजी उपसरपंच नागनाथ तळेकर, सचिव मनोज सोलापूरे, श्रीहरी तळेकर, अनंता तळेकर, अविनाश तळेकर, रमेश पाटील, संदीप गोडसे, मनोज तळेकर, दादा अवघडे, उत्तरेश्वर गोडगे, पत्रकार संजय जाधव, रमेश तळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी सरपंच प्रतिनिधी म्हणून राहुल कोरे यांनी परिश्रम घेतले.



