आदर्श शिक्षक महादेव नाईकनवरे गुरुजींचा अमृतमहोत्सवानिमित्त नागरी सन्मान -

आदर्श शिक्षक महादेव नाईकनवरे गुरुजींचा अमृतमहोत्सवानिमित्त नागरी सन्मान

0

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.१७:शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शेटफळ (ता. करमाळा) येथील आदर्श शिक्षक महादेव नाईकनवरे गुरुजी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमाच्या सांगता समारंभात ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचा नागरी सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रसिद्ध कीर्तनकार विठ्ठल पाटील महाराज, मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल, तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जगताप, जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी बोलताना विठ्ठल पाटील महाराज म्हणाले की, आई-वडिलांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टाची जाणीव ठेवणारी संतती हीच खरी संपत्ती असते. सध्याच्या काळात घरातील ज्येष्ठ मंडळी अडचण वाटत असतानाही, आपल्या आई-वडिलांची नित्यनेमाने सेवा करून त्यांना मानसन्मान देणारी मुले समाजासाठी आदर्श ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. शेटफळ येथील मधुकर नाईकनवरे व अजित नाईकनवरे यांनी वडिलांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून परिसरात नवा आदर्श निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले.

दिग्विजय बागल म्हणाले की, जीवनात ज्येष्ठांचे मार्गदर्शन नेहमीच आवश्यक असून त्यातूनच पुढील पिढीची वाटचाल उज्ज्वल होते. शंभूराजे जगताप म्हणाले की, ज्ञानदानाचे पवित्र कार्य दीपस्तंभासारखे असून नाईकनवरे गुरुजींना दीर्घायुष्य लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त केली. जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांनी नाईकनवरे गुरुजी व त्यांच्या परिवाराचा आदर्श इतरांनी घ्यावा, तसेच शिक्षणासोबतच शेती क्षेत्रातही त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले.








या कार्यक्रमात विलास सरडे महाराज, जगताप महाराज, कालठाण चंद्रकांत सरडे, राजेंद्रकुमार बारकुंड, दत्तात्रय सरडे, केरुजी गव्हाणे, सत्यवान लबडे, गणेश मोरे तसेच माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रणजीत शिंदे यांनी केले, तर आभार बापू महाराज नाईकनवरे यांनी मानले.
यावेळी शेलगावचे सरपंच अमर ठोंबरे, महापौर केसरी पैलवान विजय गुटाळ, बाजार समितीचे संतोष वारगड, माजी संचालक दादासाहेब लबडे, सरपंच काकासाहेब लबडे, माजी सरपंच पांडुरंग लबडे, भुजंग जाधव यांच्यासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!