संत निरंकारी मंडळाच्या वतीने राबवली स्वच्छता मोहिम-संगोबा येथील सीना पात्राची केली स्वच्छता..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : संत निरंकारी मंडळाच्या वतीने स्वच्छ जल स्वच्छ मन या अभियानांतर्गत संगोबा येथील सीना नदीच्या पात्राची स्वच्छता मोहिम राबविण्यात आली आहे. या स्वच्छता मोहिमेत सीना नदी पात्रातील प्लॅस्टीक कचरा, काटेरी झुडूपे व अन्य बाबी गोळा करून जाळून स्वच्छता केली आहे.
संत निरंकारी मंडळाच्या वतीने करमाळा शाखेचे प्रमुख पोपटराव थोरात, सेवादल संचालक रमेश वारे तसेच सौ. वैशाली सरडे, सेवादल शिक्षक भैरू वळेकर, सौ. विजया भुजबळ, मुकूंद साळुंके, डॉ. भाऊसाहेब सरडे यांचेसह नारायण जाधव, आत्माराम वायकुळे, शांताराम होगले, रामभाऊ नाळे या सर्वांनी नियोजन करून संत निरंकारी मंडळाच्या करमाळा शाखेच्या सर्व सदस्यांच्या वतीने जवळपास २०० जणांनी नदी पात्राची स्वच्छता केली आहे. यावेळी जालिंदर गायकवाड तसेच विनय ननवरे, राजेंद्र गायकवाड, ॲड. शशिकांत नरूटे आदी मान्यवर उपस्थित होते.

