यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात स्वच्छता अभियान संपन्न..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा यामध्ये महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण महाविद्यालय,करमाळा व 9 महाराष्ट्र बटालियन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियाना अंतर्गत एन .सी.सी.कॅडेटकडून करमाळा शहरातून स्वच्छता रॅली काढून ‘स्वच्छता हिच देश सेवा’ उपक्रमांतर्गत ‘एक तारीख एक तास स्वच्छता’ उपक्रम राबवण्यात आला .
याप्रसंगी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील व उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक, सी.टी.ओ.निलेश भुसारे व सर्व कॅडेट उपस्थित होते.


