प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने करमाळा बसस्थानक परिसराची स्वच्छता

केम (संजय जाधव) – स्वच्छता ही आरोग्याची जननी असून नागरिकांनी स्वच्छतेचा मोहिमेत सहभागी होऊन करमाळा शहर स्वच्छ व सुंदर करून आरोग्य संपन्न जीवन जगावे असे आवाहन दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ यांनी व्यक्त केले.

करमाळा शहरातील एसटी बस स्थानक परिसरात अस्वच्छता घाणीचे साम्रज्य पसरले होते. प्रचंड अस्वच्छता कचऱ्याचे ढीग व दुर्गंधीमुळे बस स्थानकामध्ये रोगराईचे वातावरण निर्माण झाले होते. करमाळा आगारातील बंद पडणाऱ्या एसटीबाबत त्यामुळे होणाऱ्या गैरसौयीबाबत एसटी आगारप्रमुखाशी चर्चा करून यावर उपाय योजना करण्यासाठी प्राध्यापक रामदास झोळ यांनी बस स्थानकाला भेट दिल्यानंतर करमाळा बस स्थानक व परिसर अस्वच्छ असल्याने प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने 23 जुलै रोजी स्वच्छता अभियान राबवण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने मंगळवार दिनांक 23 जुलै रोजी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ, सचिव सौ.मायाताई झोळ यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा शहर बस स्थानक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

या स्वच्छता मोहिमेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, करमाळा बस स्थानकाचे आगार प्रमुख विरेंद्र होनराव, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके जिल्हा युवा नेते गणेश मंगवडे, अंजनडोहचे माजी उपसरपंच शहाजी माने रयत क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुहास काळे पाटील, भाग्यश्री गरड मॅडम प्राध्यापक राजेश गायकवाड,काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष गफूर शेख, काँग्रेस आयचे उपाध्यक्ष आनंद झोळ या सर्वांनी सहभागी होऊन संत गाडगे बाबाचा स्वच्छतेचा मूलमंत्र अवलंब करून हाती झाडू घेऊन करमाळा बस स्थानक व परिसराची स्वच्छता केली. याचबरोबर रोगराई पसरू नये म्हणून जंतुनाशक पावडर ही टाकण्यात आली.

आजच्या युगामध्ये प्रत्येक जण व्यवस्थेबद्दल सुविधेबाबत अडचणींबाबत तक्रार करतो पण जबाबदार नागरिक या नात्याने आपण आपले कर्तव्य बजावतो का याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. करमाळा बस स्थानक स्वच्छतेबाबत प्राध्यापक रामदास झोळ व त्यांच्या पत्नी सौ. मायाताई झोळ यांनी स्वतः हातात झाडू घेऊन सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना नागरिकांना बरोबर स्वच्छतेचे हे अभियान सुरू केले आहे. प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशन करमाळा यांच्यावतीने स्वच्छतेचा हा उपक्रम राबवल्याबद्दल प्रवासी व नागरिकांनी त्यांचे कौतुक करून त्यांच्या उपक्रमाला व कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

करमाळा बसस्थानक परिसर स्वच्छतेचे हे अभियान प्रत्येक आठवड्याच्या दर रविवारी सुरू राहणार असून करमाळा शहरातील सुजाण नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन करमाळा शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ यांनी सांगितले आहे.

करमाळा शहर बस स्थानक स्वच्छतेचा संकल्प प्राध्यापक रामदास झोळसर यांनी केला होता त्या अनुषंगाने त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे करमाळा बस स्थानक स्वच्छतेचा उपक्रम ‌ कौतुकास्पद आहे. प्रशासनाच्यावतीने आम्ही ज्या व्यक्तीला स्वच्छतेची टेंडर दिले आहे त्यांना सक्त ताकीद देऊन करमाळा बस स्थानक परिसर स्वच्छ राखण्यासाठी योग्य व्यक्तीला स्वच्छतेचे टेंडर देण्यासाठी प्राध्यापक रामदास झोळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिफारस करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

करमाळा बस स्थानक स्वच्छ मोहीम राबवल्याबद्दल प्राध्यापक रामदास झोळ फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा रामदास झोळ त्यांच्या पत्नी सौ मायाताई झोळ यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे. प्रशासनाच्यावतीने करमाळा बस स्थानक परिसर स्वच्छ सुंदर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आगार व्यवस्थापक विरेंद्र होनराव यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!