गांधी जयंतीनिमित्त एकाच बॅचच्या मित्रांकडून उत्तरेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता

केम (संजय जाधव) – २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त केम येथील उत्तरेश्वर सेवाभावी संघटनेच्या वतीने केम येथील उत्तरेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. या मध्ये मंदिर परिसर, बगीचा, मैदान, बाजार परिसर आदी ठिकाणाची साफसफाई करण्यात आली.
या सफाईसाठी लागणारे साहित्य संघटनेचे सदस्य मनोज घोषे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च टाळून हे साहित्य देऊन वाढदिवसा निमित्त श्रमदान केले. या स्वच्छता अभियनासाठी केम ग्रामपंचायतीने घंटा गाडी कर्मचारी दिले.
केम मधील इयत्ता दहावी बॅच सन १९८७ -८८ बॅचच्या मित्रांची ही श्री उत्तरेश्वर सेवाभावी संघटना आहे. संघटनेच्या माध्यमातून गावात श्रमदान करणे, परिसर स्वच्छता, पर्यावरण संवर्धन या सारखी अनेक सामजिक कामे केली जातात.

मला स्वच्छता अभियनाची आवड असल्यामुळे माझ्या बॅचच्या मित्रांसोबत श्रमदान करण्यासाठी मी माढा तालुक्यातील चौंभे पिंपरी येथून आलो. तीन तास श्रमदान केल्याने मनाला वेगळेच समाधान लाभले.
– ज्ञानेश्वर जाधव, चौंभे पिंपरी ता माढा
या अभियनात गोसेवक परमेश्वर तळेकर,सतीश कळसाईत गुरूजी हरिदास मोळिक गुरूजी ,सुदाम कुरडे सर, पांडूरंग देवकर सर मनोज सोलापूरे, मंदिर विश्वस्त, मनोज घोषे व्यापारी अरविंद वैध कुंकू कारखानदार, राहुल कोरे सरपंच विष्णू ओहोळ सामजिक कार्यकतै, सुदर्शन भिस्ते कुंकू कारखानदार, तानाजी तळेकर बाळू,ननवरे, ज्ञानेश्वर जाधव सर चौंभे पिंपरी भगवंत लोणकर, वसंत ओहोळ, विट कारखानदार, दाउद शेख, संतोष देवकर सर, संतोष वाघमारे गुरूजी प्रमोद मारवाडी यांनी सहभाग नोदंविला. या सेवाभावी संघटनेचे केम परिसरातून कौतूक केले जात आहे.






