केतुर नं.१ मधील १४ वर्षाच्या मुलीस पळविले – अज्ञात व्यक्ती विरुद्ध वडिलांची फिर्याद
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – केतुर नं. १(ता. करमाळा) येथील दहावीत शिकणाऱ्या १४ वर्षे १० महिन्याच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवुन नेले असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी करमाळा पोलीस स्टेशनमध्ये २८ जुन रोजी नोंदवली आहे.
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादित असे म्हटले आहे की मी माझ्या मुलीला दररोज सकाळी दहा वाजता शाळेमध्ये माझ्या मोटरसायकलवर सोडत असतो व संध्याकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर तिला नेण्यास जात असतो.२७ जून रोजी मी नेहमीप्रमाणे मुलीला तिच्या केतुर नं. २ येथील शाळेत १० वाजता नेउन सोडले व मी माझे शेतीच्या व घरगुती कामाकरीता माझे गावी केतुन नं 1 येथे निघुन गेलो दिवसभर मी माझे घरगुती व शेतीचे काम केले व सायंकाळी ५ वा.च्या सुमारास मी माझ्या मुलीला तिच्या शाळेतुन घरी आणण्याकरीता तिच्या शाळेसमोर जाउन उभा राहीलो.
शाळा सुटल्यानंतर मी तिची वाट पाहत शाळेच्या गेटच्या बाहेर उभा होतो बराच वेळ झाला सर्व विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या घरी गेले परंतु माझी मुलगी ही दिसून आली नाही. म्हणुन मी तिच्या शाळेच्या आत मध्ये तिला शोधण्याकरीता गेलो व तिला शाळेमध्ये शोधले परंतु ती मला कोठेही मिळुन आली नाही. मी शाळेमधील शिक्षकांना विचारपुस केली परंतु त्यांनी मला सांगीतले कि, आम्हाला कोणतीही मुलगी विचारून गेलेली नाही. म्हणुन मी तिचा आमच्या नातेवाईकाकडे, आजुबाजुच्या परीसरात शोध घेतला परंतु ती आम्हास कोठेही मिळुन आली नाही.तिला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून संशय आल्याने मी करमाळा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात इसमा विरुदध फिर्याद दिली. याविषयी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने हे करत आहेत.