गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा संपन्न..

करमाळा पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील यांचा 30 जुन रोजी सेवानिवृत्त झाले असून, त्यानिमित्त त्यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा नुकताच पंचायत समिती सभागृहात उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी सेवापूर्ती कार्यक्रमासाठी उपसंचालक कार्यालय पुणे येथील शिक्षण निरीक्षक रावसाहेब मिरगणे तसेच करमाळा तालुक्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, रायगड जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, माण खटावचे गटशिक्षणाधिकारी माणिक राऊत, शिरूर घोडनदी पुणे येथील गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर, देऊळगाव राजेचे गटशिक्षणाअधिकारी दशरथ पाचंगरे,मुरुड जंजिऱ्याचे गटशिक्षणाधिकारी बाबूलाल पाखरे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच पंचायत समिती करमाळा येथील विस्ताराधिकारी जयवंत नलवडे, मिनीनाथ टकले, नितीन कदम, सर्व केंद्रप्रमुख,माध्य व प्राथमिक सर्व मुख्याध्यापक,शिक्षक बंधू भगिनी,गटसाधन केंद्रातील विषयसाधन व्यक्ती,विशेष शिक्षक व विविध शिक्षक संघटनांचे मान्यवर पदाधिकारी तसेच पाटील साहेबांचे कुटूंबीय-नातेवाईक यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साही वातावरणात पार पडला.सर्व अधिकारी,शिक्षक ,नातेवाईक यांनी पाटील यांच्या कामकाजाचे कौतुक केले व सर्वांशी आपुलकीने मिळून मिसळून कामकाज केल्याने सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.




