करमाळा उपजिल्हा रुग्णालयात मोफत 2D इको तपासणी व हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

करमाळा(दि.१८): मुक्ताई मंगेश चिवटे हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या साठव्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या ‘एकनाथ हिरक आरोग्य वर्ष’ या उपक्रमांतर्गत करमाळा शहर व तालुक्यातील लहान मुलांसाठी मोफत 2D इको तपासणी व हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर बुधवार, दिनांक 21 मे 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत उपजिल्हा रुग्णालय, करमाळा येथे पार पडणार आहे. शिबिराचे आयोजन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, आरोग्यदूत फाउंडेशन व बालाजी हॉस्पिटल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

शिबिरादरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांकडून बालकांची मोफत तपासणी केली जाणार असून, आवश्यक असल्यास पुढील हृदय शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा अधिकाधिक गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले आहे.




