‘मुलींची सामाजिक सुरक्षितता’ या विषयावर उत्तरेश्वर कॉलेज मध्ये प्रा.डॉ. भिसे यांचे व्याख्यान संपन्न

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज येथे ग्रामीण भागातील मुलींची सामाजिक सुरक्षितता या विषयावर श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील ग्रहविज्ञान महिला महाविद्यालय, अकलूज येथील प्रसिद्ध व्याख्यात्या प्रा.डॉ. छाया भिसे यांचे अभ्यासपूर्ण असे व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमास प्रा.के. के. कोरे , प्राचार्य श्री सुभाष कदम यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात प्रा . डॉ. छाया भिसे मॅडम यांनी ग्रामीण भागातील मुलींना समाजात वावरताना येणाऱ्या अडचणी सांगून त्यावरील मात कशी करावयची याविषयी सखोल चर्चा केली. या मुलींनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा व संस्काराचा वारसा जपले पाहिजे. मोबाईल मुळे निर्माण झालेल्या चंगळवादी संस्कृती पासून आपण दूर राहिले पाहिजे असा त्यांनी सल्ला दिला.

या कार्यक्रमासाठी प्रा.डॉ. मच्छिंद्र नागरे, प्रा.संतोष साळुंखे, प्रा.संतोष रणदिवे, प्रा.एस.के.पाटील, प्रा.सतीश बनसोडे यांनी परिश्रम घेतले या ग्रामीण भागातील काॅलेज मध्ये दर शनिवारी वेगवेगळे उपक्रम येथील प्राध्यापक राबवतात यामुळे या काॅलेज चे केम परिसरातून कौतुक केले जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!