‘कर सहाय्यकपदी’ निवड झाल्याबद्दल जीवन लोंढे यांचा सत्कार
कंदर प्रतिनिधी/ संदीप कांबळे..
कंदर : कोंढेज (ता.करमाळा) येथील रहिवाशी असलेले माजी सैनिक खंडू लोंढे यांचे चिरंजीव जिवण खंडू लोंढे यांची कर सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल कवीटगाव तालुका करमाळा येथे नुकताच सत्कार करण्यात आला .सन 2022 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत जीवन लोंढे यांनी उज्वल यश संपादन केले आहे.
जीवन लोंढे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा कोंढेज येथे झाले असून माध्यमिक शिक्षण जेऊर येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पंढरपूर येथे झाले आहे .तसेच कॅम्पुटर इंजिनिअरिंग कोल्हापुरातील कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे झाले आहे. जीवण लोंढे यांचा सत्कार विक्रीकर अधिकारी शिवाजी पांडव यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना जीवन लोंढे म्हणाले की मला लहानपणापासूनच प्रशासकीय सेवेत काम करण्याची इच्छा होती.हेच ध्येय समोर ठेवून माझे मामा शिवाजी पांडव यांचे बहुमोल्य सखोल मार्गदर्शन आई वडिलांचे आशीर्वाद आणि कष्ट जिद्द चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे .कार्यक्रमास कविटगाव चे सरपंच शिवाजी सरडे ज्योतीराम भोसले विठ्ठल चौधरी रावसाहेब पाटील विष्णू पाटील गोरक्षनाथ सोनवणे माजी सरपंच पोपट पांडव दादा पांडव रामभाऊ पांडव पत्रकार संदीप कांबळे भाऊसाहेब सातव अण्णा कांबळे चरण पांडव कुंडलिक पांडव वसंत शिंदे उमेश पांडव रोहिदास पांडव दत्तात्रय पांडव लक्ष्मण शिंदे महादेव शिंदे रघुनाथ जाधव संपत जाधव उत्तम कांबळे मंगेश गायकवाड आदी उपस्थित होते..