कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालय, करमाळा येथे संविधान दिवस उत्साहात साजरा

करमाळा : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालय, करमाळा येथे २६ नोव्हेंबर रोजी ७६ वा संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रस्ताविकेचे वाचन आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी भाषण, घोषवाक्ये आणि संविधान गीतावर जनजागृतीपर नृत्य सादर केले. या विशेष उपक्रमासाठी शिक्षक संघमित्रा ओहोळ यांनी मार्गदर्शन केले. तसेच शिक्षक अनिल गावीत यांनी संविधानाच्या प्रतिकृतीचे आकर्षक रेखाटन करून कलेच्या माध्यमातून संविधानाप्रती कृतज्ञता आणि जागरूकतेचा संदेश दिला.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना कांबळे यांनी केले. शिक्षक जितेश कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव यांच्या हस्ते, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पार पडला.


