संगोबा येथील बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे सुरू – ॲड.शशिकांत नरुटे व लाभधारक शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : संगोबा (ता.करमाळा) येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट व चुकीच्या पध्दतीने काम सुरु असून, शासनाने लाखो रुपये खर्च करून हे काम चालू आहे एखादा बोर्ड देखील याठिकाणी लावण्यात आला नाही, सदर बांधकाम तातडीने बंद करून जर मंजूर प्लॅन इस्टीमेटनुसार सुरू झाले नाही तर संगोबा येथे ‘रास्ता रोको’ व तहसिल कार्यालय करमाळा तसेच करमाळा पाटबंधारे प्रशासनावर ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा तालुकाध्यक्ष ॲड.शशिकांत नरुटे व संगोबा बंधारा लाभधारक शेतकरीवर्गाने दिला आहे.

दिलेल्या प्रेसनोट मध्ये त्यांनी म्हटले आहे की, बंधाऱ्याच्या खालच्या बाजूने सोलिंगचे काम करताना कोणत्याही प्रकारची खोदाई केली नाही, याउलट तेथे दगड न टाकता फक्त माती व इतर नदी मधीलच मानाड उकरुन त्यात भरले आहे. तसेच बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूस भिंत बांधायची म्हणून मोठमोठे खड्डे खोदून अर्धवट काम ठेवले आहे, जर या परिसरात पाऊस झाला तर पाठीमागे 1998-1999 मध्ये बंधाऱ्याच्या दोन्ही बाजू वाहून गेल्या होत्या. तसेच पुन्हा परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढे मोठे 55 ते 60 लाख रुपयाचे काम चालू असताना पाटबंधारे खातेचे एकही कर्मचारी अथवा काॅलीटी कंट्रोल कर्मचारी येथे उपस्थित नाही. प्रशासनाने हे काम तातडीने थांबवून प्लॅन इस्टीमेट नुसार काम सुरु करावे अन्यथा संगोबा येथे ‘रास्ता रोको’ व तहसिल कार्यालय करमाळा व करमाळा पाटबंधारे प्रशासनावर ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा तालुकाध्यक्ष ॲड.शशिकांत नरुटे व संगोबा बंधारा लाभधारक शेतकरीवर्गाने दिला आहे.

