करमाळा तालुक्यातील बांधकाम कामगारांनी ‘मध्यांन भोजन योजने’चा लाभ घ्यावा – गणेश चिवटे

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा – पिंपळवाडी (ता.करमाळा) येथे बांधकाम कामगारांना ‘मध्यांन भोजन योजने’चा शुभारंभ करण्यात आला, यावेळी मध्यांन भोजन योजनेचा जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करमाळा भाजपचे अध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले आहे.

याबाबत बोलताना ते म्हणाले की,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यातील 11 गावातील बांधकाम कामगारांना आजपासून मध्यान भोजन योजना सुरु करण्यात आली आहे.

या योजनेनुसार बांधकाम कामगारांना दुपारचे जेवण (चपाती-भाजी, वरण-भात,लोणचे) त्यांच्या गावात मिळणार आहे, तरी जास्तीत जास्त कामगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.चिवटे यांनी केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, दिपक गायकवाड, आतिष पाटील, वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, नितीन झिंझाडे, गणेश महाडिक, पवार व बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!