एसटी एम्प्लॉईज को. ऑफ. क्रेडिट सोसायटी सोलापूर नुतन संचालक पदी नानासाहेब नलवडे यांची निवड

करमाळा (दि.२७)) – एसटी एम्प्लॉईज ऑफ क्रेडिट सोसायटी सोलापूर च्या निवडणुकीमध्ये एसटी कामगार संघटनेच्या पॅनलने १३-० ने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले.या निवडणुकीमध्ये करमाळा आगाराचे एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष चालक श्री. नानासाहेब ज्ञानदेव नलवडे यांची नूतन संचालक पदी भरघोस मताने निवड झाली.
श्री . नलवडे हे करमाळा आगारातील कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सदैव अग्रेसर असतात यावेळी नूतन संचालक श्री . नलावडे बोलताना म्हणाले की, सर्व सोसायटीच्या सभासदांनी मला मत रुपी आशीर्वाद देऊन सोसायटीच्या संचालक पदी निवडून आणले त्याबद्दल मी सर्व सभासदांचा ऋणी आहे व भविष्यात आणखी जोमाने कर्मचाऱ्यांच्या आगर पातळीवरील विविध समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील असे नूतन संचालक श्री. नलवडे बोलताना म्हणाले यावेळी प्रवीण कांबळे, अभिजीत पाटील ,श्रीकांत गोमे, नागेश चव्हाण ,सचिन माने, रामदास कांबळे , नागेश फसले , शहाजी गाडगे, बप्पा नलवडे, सुनील माने ,बालाजी घाडगे, विक्रम रोडगे ,संतोष शिरोळे ,गणेश भिसे ,मोहन हांडे ,नारायण रेगुडे , आदी सह पदाधिकारी उपस्थित होते.





